About Institution

नविन मराठी शाळा, वाई    30-May-2023
Total Views |
नवीन मराठी शाळा २३ जून १९७५ साली माननीय श्री. व्यंकटेश केशव देशपांडे यांच्या प्रेरणेतून व श्रीमती मैनाताई नित्सुरे यांच्या सहकार्यातून या शाळेची स्थापना झाली. १९८९ पासून शासनाकडून अनुदान मिळाले. १९९८ साली शाळेच्या नवीन इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. सन २००० साली नवीन मराठी शाळेच्या बालचमूनी नवीन वास्तूत श्री गणेशा केला. २०१८ साली हीच नवीन मराठी शाळा स्वतःच्या भव्य वास्तूत स्थलांतरित झाली.
       शाळाचे वैशिष्ट्ये म्हणजे  प्रत्येक विभागासाठी सर्व भौतिक सुविधांनी युक्त व सुसज्ज व स्वतंत्र इमारती भव्य क्रीडांगण, डिजिटल वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, चाळीस पेक्षा जास्त संगणक असणारा अद्ययावत संगणक कक्ष सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा सर्व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असलेले शाळेच्याच नव्हे तर वाईच्या वैभवात भर घालणारे साऊंड प्रूफ, उत्तम प्रकाश योजना व २०० पेक्षा जास्त असे व्यवस्था असलेले आमचे सत्यवती जोशी सभागृह 
 
     या शाळेमध्ये  सर्व वर्ग डिजिटल आहेत  या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण ,संस्कारक्षम,आनंददायी शिक्षण दिले जाते . शालेय उपक्रमात पालकांचा सहभाग असतो त्यातूनच शिक्षक पालक विद्यार्थी सुसंवाद साधला जातो. 
बाह्य परीक्षा व स्पर्धा परीक्षा यांची तयारी करून घेतली जाते .  शाखांतर्गत  व शालांतर्गत विविध स्पर्धा घेतल्या जातात  आणि विद्यार्थांच्या सर्वांगीण विकास साधला जातो. व त्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो.